.comment-link {margin-left:.6em;} <$BlogRSDURL$>

Tuesday, March 30, 2010

गोरगरिंबाची विठूमाऊली महागली!

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5731867.cms

तिरुपती च्या विकतच्या दर्शनाला नाक मुरडताना, मला पंढरपूरचा नेहमी दाखला देता येत असे. आता ती सुद्धा सोय राहिली नाही!!

Friday, March 26, 2010

अरे देवा!!

राज्य सरकारचं बजेट बघून दुसरं काय म्हणणार?

* तुळजापूरच्या भवानीमातेच्या देवस्थानाकरिता विकास प्राधिकरण. आगामी वर्षाकरिता ७५ कोटी रुपयांची तरतूद
* संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जन्मचतु:शताब्दीनिमित्त देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर व पालखी तळ या ठिकाणच्या कामांसाठी १४० कोटी रुपये
* शेगाव येथील गजानन महाराजांच्या समाधीस १०० वषेर् पूर्ण होत असल्यामुळे तेथील सोहळ्याकरिता २५० कोटी रुपये. त्यापैकी ६५ कोटींची तरतूद आगामी वर्षात.
* तीर्थक्षेत्र पैठणच्या विकासासाठी तुळजापूर, शिडीर्च्या धतीर्वर विकास प्राधिकरण स्थापन करणार. त्यासाठी २०० कोटींचा विकास आराखडा प्रस्तावित.
* जेजुरी देवस्थान विकासाकरिता पाच कोटी रुपये
* कोकणातील श्री क्षेत्र परशुरामकरिता पाच कोटी, भराडी देवी माता देवस्थानाकरिता दोन कोटी तर श्री क्षेत्र कुणकेश्वरकरिता दोन कोटी रुपये


आणि, श्वास रोखून धरा,

* ग्रंथालय चळवळीस चालना देण्यासाठी सातारा, नांदेड, जालना व रायगड येथे उपकेंदे स्थापन करण्याकरिता दोन कोटी

वा वा! तुम्हाला यात पण रस आहे वाटतं!!

Labels:


Monday, March 15, 2010

विन्दा करंदीकर गेले!

’सकाळ’ने छान लेख दिलेत आज त्यान्च्यावर.... म. टा. च्या site वर पण खुप काही दिसतंय, अजून वाचायचंय...
त्यांची पहिली ओळख म्हणजे: त्या तीन सुप्रसिध्द कवींपैकी एक!

नंतर एकदा, ’आनंद यादवांचे’ पुस्तक वाचताना कळलं: ते रत्नागिरीच्या college मधे English शिकवत असत! म्हटलं ’अरेच्या’ आणि मग ’अरे व्वा’

२००३ मधे त्यांचं ’अष्टदर्शने’ बद्दल ऐकलं आणि नंतर ते पुस्तक विकत घेतलं. माझ्या संग्रहातलं हे त्यांचं पहिलं पुस्तक! माझ्या संग्रहातला ’हिरा’ बनून राहिलंय!!
सलील लहान असताना बड्बड गीतांचं पुस्तक आणलं होतं, त्यात अनेक उत्तम गाणी होती विन्दांची! आणि पुन्हा एकदा ’अरे वा’!

आज त्यांच्या ’चार्वाक दर्शना’तलं दिल्याशिवाय राहवत नाहिये:

भारतीय दर्शनात । चार्वाक दर्शन
नास्तिक म्हणून । सुप्रसिध्द.
.
.
लोकांना रुचणारे । लोकांत प्रस्रुत
म्हणून ’लोकायत’ । असे नाव
.
.
.
चार्वाक मानतो । प्रत्यक्ष हेच प्रमाण
शब्द व अनुमान । अव्हेरून.
धर्मग्रंथातील । शाब्दिक विधान
द्न्यानाचे साधन । नसे होत.
.
.
.

This page is powered by Blogger. Isn't yours?