.comment-link {margin-left:.6em;} <$BlogRSDURL$>

Monday, March 15, 2010

विन्दा करंदीकर गेले!

’सकाळ’ने छान लेख दिलेत आज त्यान्च्यावर.... म. टा. च्या site वर पण खुप काही दिसतंय, अजून वाचायचंय...
त्यांची पहिली ओळख म्हणजे: त्या तीन सुप्रसिध्द कवींपैकी एक!

नंतर एकदा, ’आनंद यादवांचे’ पुस्तक वाचताना कळलं: ते रत्नागिरीच्या college मधे English शिकवत असत! म्हटलं ’अरेच्या’ आणि मग ’अरे व्वा’

२००३ मधे त्यांचं ’अष्टदर्शने’ बद्दल ऐकलं आणि नंतर ते पुस्तक विकत घेतलं. माझ्या संग्रहातलं हे त्यांचं पहिलं पुस्तक! माझ्या संग्रहातला ’हिरा’ बनून राहिलंय!!
सलील लहान असताना बड्बड गीतांचं पुस्तक आणलं होतं, त्यात अनेक उत्तम गाणी होती विन्दांची! आणि पुन्हा एकदा ’अरे वा’!

आज त्यांच्या ’चार्वाक दर्शना’तलं दिल्याशिवाय राहवत नाहिये:

भारतीय दर्शनात । चार्वाक दर्शन
नास्तिक म्हणून । सुप्रसिध्द.
.
.
लोकांना रुचणारे । लोकांत प्रस्रुत
म्हणून ’लोकायत’ । असे नाव
.
.
.
चार्वाक मानतो । प्रत्यक्ष हेच प्रमाण
शब्द व अनुमान । अव्हेरून.
धर्मग्रंथातील । शाब्दिक विधान
द्न्यानाचे साधन । नसे होत.
.
.
.

Comments: Post a Comment


This page is powered by Blogger. Isn't yours?