Thursday, November 25, 2010
अनिल अवचट : एक आवडणं....
मनीषनं ही लिंक दिली, facebook वर share केली, खरं तर: अनिल अवचट: एक न आवडणं
आमच्या orkut community वर नवीन धागा पण सुरु केला त्यानं (मला पण यावर चर्चा व्हावी, असं वाटत होतंच): Some criticism
वरचा blog post नक्की वाचा आधी...मगच मी काय म्हणतोय ते कळेल...
.
.
.
जेव्हा मी हे वाचायला सुरुवात केली, तेव्हा मला वाटलं की हे उच्च मध्यमवर्गावर आहे. ज्ञानदा ला या लोकांची फ़ारच चीड आलेली दिसतेय :)
उदा.
>> 'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय
:) :)
पण नंतर ती पु. ल. , आनंद नाडकर्णी आणि अनिल अवचट यांच्यावर घसरली! खरं तर त्यांच्या लेखनावर. म्हणून मी आता यावर " ही माणसं कसं आयुष्य जगली, ते तरी बघ.." असा प्रति मुद्दा मांड्णार नाही. कारण तो तुझा मूळ मुद्दा नसावा...
मग फ़क्त हे लेखक आणि त्यांचं लेखन!
आता यापैकी मी बाबा (अवचट) बद्दल बोलीन, कारण मी त्याचं बरचसं लिखाण वाचलंय आणि त्याला थोडाफ़ार ओळखतोही...
.
.
.
बाबा च्या लेखनाचे दोन ठळक भाग मला वाटतात:
१) पत्रकार बाबा :
यांत ’माणसं’ ’संभ्रम’ वगैरे लिखाण येतं. ’वेध’ सारखं धारदार/टीकात्म सुद्धा. मला हे लिखाण खूप आवडलंय. यातला ’बाबा’ चा समाजवादी सूर active आहे. शिवाय हे बाबाचं लेखन थोडं त्याच्या तरूणपणीचं आहे. त्यात ’जोश’ आहे.
२) स्वानंदी बाबा :
यांत ’छंदांविषयी’, ’स्रुष्टीत...’, ’जनात...’ वगैरे लिखाण येतं. केशवसुतांनी नविन कवींना सल्ला दिला होता की : स्वानंदासाठी कविता करा. हा सल्ला बाबाने फ़ारच मनावर घेतला की काय असं मला वाटतं कधी कधी :)!
आता यांत निखिल वागळे च्या शब्दात सांगायचं तर : बाबा सपशेल लेखक झालाय!
यातली काही पुस्तकं मला पण खूप ’बोअर’ वाटतात! ’दिसले ते’, ’स्रुष्टीत...’आणि ’जनात...’ तर मी पूर्ण वाचलीही नाहीत.
So 'Objection: Boring' : can't altogether 'overruled'!!
आता अजून एक महत्वाची गोष्ट: आपण एखाद्या लेखका बद्द्ल मत बनवत असतॊ, ते त्याचं काही लेखन वाचून. पण यांत आपण judgemental error करू शकतो! इथे ’बाबा’चं जर फ़क्त ’स्वानंदी’ लेखन वाचलं तर नक्कीच judgement चुकेल!
Comments:
Post a Comment